मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी विभाग स्तरावर भरारी पथके कार्यरत

 मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी विभाग स्तरावर भरारी पथके कार्यरत

मुंबई, दि ५
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ यांच्याद्वारे कळविण्यात आल्यानुसार हिवाळ्यात हवेच्या कमी तापमानामुळे व वेगवान वा-याच्या अभावाने जमिनीलगतची प्रदूषके ही उंचीवरील हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी होते. मुंबईच्या नैसर्गिक हवामानाच्या स्थितीनुसार दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत प्रदूषणाच्‍या प्रमाणात वाढ होत असते. मुंबई शहरातील वायू प्रदूषण वाढण्‍यास विविध कारणे कारणीभूत आहेत. यामध्‍ये औद्योगिक उत्‍सर्जन, बांधकामांच्‍या ठिकाणी निर्माण होणारी धूळ, रस्‍त्‍यावरील धुळीचे पुर्नप्रक्षेपण, कारखान्‍यातील उत्‍सर्जन, कचरा जाळणे, कारखाने व वाहनातून निघणारा धूर इत्‍यादींमुळे प्रदूषणाच्‍या प्रमाणात वाढ होत असते.
दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ सुधारित २८ मुद्यांचे ‘सर्वकष मार्गदर्शक तत्वे’ व सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. यामध्ये बांधकाम प्रकल्पाच्या सभोवताली धूळप्रदूषण रोखण्याकरिता पत्र्यांचे कुंपण उभारणे, हिरव्या कपडयांचे आच्छादन करणे, पाणी-फवारणी करणे, राडारोडयाची शास्त्रशुध्द साठवण व ने-आण करणे, बांधकामाच्या ठिकाणी वायू-प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसविणे, धूरशोषक यंत्रे बसविणे व इतर महत्वाच्या उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत.
सदर सर्वकष मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विभाग स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत व भरारी पथकांकडून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द तात्काळ व कठोर कारवाई करण्यात येत आहे.
बांधकामामुळे निर्माण होणा-या धुळीसाठी, नियमांचे पालन न करणा-या बांधकाम प्रकल्पांना प्रारंभी लेखी सूचना (Intimation), दिल्यानंतर ‘कारणे दाखवा नोटीस’आणि ‘काम थांबवण्याची नोटीस’ देण्यात येते. त्‍यानुसार ०१ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ५५७ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस, तसेच २३३ ठिकाणी ‘काम थांबवण्याची नोटीस’ देण्यात आली असून सदर कार्यवाही सातत्याने सुरू आहे.
ज्या क्षेत्रात २०० च्या वर वायु गुणवत्ता निर्देशांक गेला तर संबंधित क्षेत्रामध्ये ‘GRAP 4’ अंतर्गत बांधकामे थांबविण्यात येतील. तसेच प्रत्‍येक बांधकामांवर ‘Low Cost Sensor (LCS)’ वायु गुणवत्ता मापन संयंत्रे बसविणे बंधनकारक करण्‍यात आलेले आहे. त्‍यानुसार आतापर्यंत एकूण १,०८० बांधकामांनी अशी संयंत्रे बसविली आहे.
सध्‍या मुंबईत एकूण २८ ‘सतत वातावरणीय वायु गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे’ (CAAQMS) आहेत. त्‍यापैकी महाराष्‍ट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या अखत्‍यारित १४ केंद्रे, भारतीय उष्णकटिबंधीय मौसम विज्ञान संस्थान (Indian Institute of Tropical Meteorology), पुणे, अंतर्गत ९ केंद्रे आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या अखात्‍यारित ५ केंद्रे कायर्रत आहेत. ही सर्व प्रमाण दर्जाची CAAQMS केंद्रे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार मोजमाप, कॅलिब्रेशन, गुणवत्‍ता हमी आणि डेटा प्रमाणिकरणसाठी राष्‍ट्रीय माणके व प्रोटाकॉलचे पालन करतात.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) व महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB)द्वारे मान्‍यताप्राप्‍त ‘Sameer’ मोबाईल ऍप हे सतत वातावरणीय वायु गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रावरील वास्तविक ‘वायु गुणवत्‍ता निर्देशांक’ (AQI) प्रसारित करीत असते.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या मार्गदर्शक तत्‍वावानुसार CAAQMS केंद्रावर नोंदविण्‍यात आलेल्‍या २४ तासाच्‍या सरासरी आधारीत वायू गुणवत्‍ता निर्देशांक दर्शवितात. तसेच यासाठी डेटा प्रमाणीकरण, कॅलिब्रेशन आणि गुणवत्‍ता नियंत्रणासाठी निर्धारित प्रक्रियेचे पालन केले जाते.
बृहन्‍मुंबई महानगर क्षेत्रातील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या ‘Sameer’ ऍप्लिकेशन प्रमाणित CAAQMS माहितीनुसार, ०१ ते ०४ जानेवारी २०२६ या कालावधीतील केंद्र निहाय २४ तासाची सरासरी वायू गुणवत्‍ता निर्देशांक AQI दर्शविते की, ०१ व ०२ जानेवारी २०२६ रोजी रात्री मुंबईतील वायू गुणवत्‍ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीत होते. तर ०३ व ०४ जानेवारी २०२६ रोजी मध्‍यम श्रेणीत होते.
काही त्रयस्थ पक्षीय संस्‍थाद्वारे, Low Cost Sensor (LCS) मॉडेल, क्राउड सोर्स डेटा आधारित अनुमान किंवा उपग्रह आधारित अंदाज व्‍यक्‍त करतात. ते केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या मागदर्शक तत्‍वांनुसार व NAQI नुसार कॅलिब्रेशन व प्रमाणीकरण प्रक्रियेचे पालन करीत नाहीत. या द्वारे व्‍यक्‍त केला गेलेला वायू गुणवत्‍ता निर्देशांक (
AQI) हा बहुतेक वेळा फक्‍त अंदाज व्‍यक्‍त करीत असतो. सबब नागरिकांनी केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या संकेतस्‍थळावरील प्रदूषकाची पातळी (मायक्रो ग्रॅम पर m3) किंवा ‘Sameer’ ऍपवरील वायू गुणवत्‍ता निर्देशांक (AQI) निर्देशांक हेच गृहीत धरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *