मुंबई प्रभाग १४४ महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा
मुंबई, दि ७: मुंबई महानगरपालिका निवडणूक जश जशी जवळ येत आहे.तसतसे पक्षामध्ये पक्षप्रवेशाची चढाओढ बघायला मिळत असली तरी कोणत्याही पक्षात न राहता स्वबळावर आपला अपक्ष उमेदवार अर्ज भरून जिंकण्याची जिद्द उराशी बाळगून प्रभाग क्रमांक १४४ मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) महिला शाखा संघटक व संपर्क प्रमुख सौ. ममता मधुकर भंडारी यांनी पक्षाला धडाकेबाज राजीनामा दिला आहे. प्रभाग खुला वर्ग झाल्याने पक्षाला जागा न मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय घेतल्याचे आपल्या राजीनाम्यात स्पष्ट केले आहे.
दीर्घकाळ प्रभागात कार्यरत राहून संघटना वाढीसाठी प्रयत्न केले असून, जनसंपर्क आणि जनविश्वास मोठ्या प्रमाणात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पक्षाने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतानाच, प्रभागातील जनतेच्या अपेक्षांमुळे स्वतंत्र उमेदवारी आवश्यक झाल्याचे त्यांनी नमूद केले.
ममता भंडारी यांच्या या निर्णयामुळे प्रभाग १४४ मधील आगामी निवडणुकीचे राजकारण तापण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.KK/ML/MS