राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी भाईदरच्या ४ मुलींची संघात निवड

भाईंदर दि ५ :- १४ ते १८ जून बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी बालयोगी कबड्डी अकॅडमी राई भाईंदर संघाच्या ४ मुलीं १) भार्गवी म्हात्रे २) मनस्वी पाठारे, ३) संस्कृती पाटील, ४)कुमकुम सिंग यांची
मुंबई उपनगर संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाला संलग्न राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना १८ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा बालेवाडी पुणे येथे दि. १४ ते १८जून २०२५ या कालावधीत पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
बालयोगी कबड्डी संघाचे प्रशिक्षण मिरा भाईंदर महानगरपालिका अग्निशमन दल फायर ऑफिसर सदानंद पाटील हे २०१८ पासून मुली व मुलांना देत आहेत .बालयोगी कबड्डी अकॅडमीमध्ये ७० मुली व मुलांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. मेहनत आणि नियमित सरावामुळे मुलींना यश मिळाले आहे.त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.