आमची युनियन ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही
आमदार भाई जगताप.

मुंबई, दि ३
भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियन कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली युनियन असूनही कधीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होणार नाही असे जाहीर प्रतिपादन आमदार भाई जगताप यांनी दादर येथे आयोजित केलेल्या कामगार नेते एस आर सावंत यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले एस आर सावंत यांचे काम मी फार पूर्वीपासून पाहत आलो असून त्यांच्या कामाप्रती असलेला वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणा ही त्यांच्याकडे ईश्वराने दिलेली फार मोठी देणगी आहे. त्यांनी आता अमृत महोत्सवी झाली म्हणून थांबू नये तर अजून जोराने काम करावे. त्यांचे पुढील आयुष्य आनंदात जावे यासाठी मी मनापासून प्रार्थना करतो.
मी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ ही युनियन म्हणून जारी असली तरी मी तिला मातृसंस्था प्रमाणेच पाहतो. मी या युनियन मध्ये आल्यापासून अनेकांनी सांगितले की हे काय काम करणार. पण मी काम करून दाखवले आणि कोषाध्यक्ष पदाची माझ्यावर भाई जगताप यांनी जी जबाबदारी दिली ती मी पूर्ण विश्वासाने पार पाडली त्याचा मला मनापासून अभिमान असल्याचे जाहीर प्रतिपादन महासंघाचे कोषाध्यक्ष एस आर सावंत यांनी यावेळी व्यक्त केले. या समारंभात सुरक्षा घोसाळकर यांचा चिरंजीव सुरज गोसावी यांची इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे देखील जाहीर सत्कार करण्यात आला.या समारंभाला समाजसेविका तेजस्विनी जगताप, दिलीपदादादा जगताप, अनंत जाधव, प्रवीण मंत्री,सुरक्षा घोसाळकर, युनियनचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. KK/ML/MS