सावधान, या भारतीय कफ सिरपबाबत WHO ने दिला गंभीर इशारा

 सावधान, या भारतीय  कफ सिरपबाबत WHO ने दिला गंभीर इशारा

मुंबई, दि.  12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) भारतीय औषध कंपनी  Marion Biotech उत्पादीत दोन कफ सिरप लहान मुलांसाठी वापरली जाऊ नयेत असा गंभीर इशारा दिला आहे. Ambronol आणि DOK -1 Max ही कफ सिरप गुणवत्ता मानकांची पूर्ता करत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर  वापरावर बंदी घालण्यात यावी असे संघटनेने सुचित केले आहे.

उझबेकीस्तान मध्ये कफ सिरप घेतल्यामुळे 19 लहान मुलांचा मृत्यू झाला होता. हे कफ सिरप देखील Marion Biotech कंपनीनेच उत्पादीत केले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यावर भारतीय आरोग्य मंत्रालयाने या कंपनीच्या उत्पादनांवर तातडीने बंदी घातली होती.  या कंपनीचे कार्यालय नोएडा सेक्टर ६७ मध्ये आहे. उत्तर प्रदेश सरकारने या कंपनीचा उत्पादन परवाना आता रद्द केला आहे.

SL/KA/SL

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *