सावधान हे ॲप तुमचे बोलणे करतेय तुमच्या नकळत रेकॉर्ड

 सावधान हे ॲप तुमचे बोलणे करतेय तुमच्या नकळत रेकॉर्ड

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुम्हाला माहित आहे का की तुमचा फोन बंद असतानाही तुमचा आवाज रेकॉर्ड केला जातोय ? हे जर कुणी आपल्याला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक ॲप फोन बंद असतानाही आवाज रेकॉर्ड करत असल्याचा आरोप केला जात आहे. ट्वीटरचे मालक एलॉन मस्क यांनीसुद्धा हे ट्वीट शेअर केलं आहे.हे ॲप दुसरे तिसरे कोणतेच नसून व्हाट्सॲप असून त्याच्याद्वारे रेकॉर्ड होत असल्याचा आरोप आहे.

Beware this app is recording your speech without your knowledge
अधिक माहितीनुसार, Foad Dabiri या ट्वीटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये मोबाईलच्या सेटिंगचे काही स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले आहेत. “मी रात्री झोपेत असतानासुद्धा व्हाट्सअप मायक्रोफोनचा वापर करत आहे. हे काय चाललं आहे. सकाळी उठून मी चेक केलं असता मला हे दिसलं.” असं ट्वीटमध्ये लिहण्यात आलं आहे.
दरम्यान, हे ट्वीट एलॉन मस्क यांनीही हे ट्वीट शेअर केलं असून “व्हाट्सअपवर कधीच विश्वास ठेवू शकत नाही” असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आपली सुरक्षा धोक्यात असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

एखादं मोबाईल ॲप वापरायला सुरूवात करताना आपण आपल्या फोनमधील कोणकोणते ॲप वापरायला परवानगी देतो हे आपण पाहिलं पाहिजे. कधीकधी आपली वैयक्तिक माहिती लीक होऊन फोन हॅक होऊ शकतो. त्यामुळे वापरकर्त्यांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी.

ML/KA/PGB
10 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *