सावधान, देशात वाढतोय कोरोनाचा धोका

 सावधान, देशात वाढतोय कोरोनाचा धोका

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२० मध्ये जगाला हादरवून टाकणारा कोरोना व्हायरस आता पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. जगभरातील काही देशांतून कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहे. त्यातच आता देशातही कोरोनाच्या केसेस आढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल आपल्या आरोग्य बुलेटिनमध्ये देशात रविवारी कोरोनाचे 335 नवीन रुग्ण आढळले असून उत्तर प्रदेशात 1 आणि केरळमध्ये 4 जणांचा मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती दिली आहे. देशात सध्या कोविडची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,701 वर पोहोचली आहे.

केरळमध्येच कोविड सब-व्हेरियंट JN.1 आढळला आहे. यापार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांनी आरोग्याशी संबंधित सुरक्षा वाढवली आहे. केरळमध्ये कोरोनाचा सर्वात प्राणघातक प्रकार आढळून आला आहे. यामुळे सावधगिरी बाळगत कर्नाटक सरकारने नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे.

आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. पुन्हा एकदा देशातील इतर राज्यात देखील मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोरोनाच्या जेएन १ (JN. 1) व्हेरिएंटमुळे सिंगापूरमध्ये तब्बल ५६ हजार लोकांना त्याची बाधा झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सर्वाधिक फटका अमेरिका आणि चीनमधील लोकांना बसत आहे.

SL/KA/SL

18 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *