भाजपा बेस्ट कामगार संघ बेस्ट पतपेढीची निवडणूक लढणार आणि जिंकणार
कामगार नेते गजानन नागे.

 भाजपा बेस्ट कामगार संघ बेस्ट पतपेढीची निवडणूक लढणार आणि जिंकणारकामगार नेते गजानन नागे.

मुंबई, दि १५
बेस्ट कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी व सध्या सुरू असलेला मनमानी कारभार संपविण्यासाठी सहकार विकास पॅनल बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणुकीच्या रिंगणात उतरला असल्याची माहिती भाजपा बेस्ट कर्मचारी संघाचे अध्यक्ष गणेश हाके आणि सरचिटणीस गजानन नागे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दि बेस्ट एम्पलोयीज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक येत्या १८ ऑगस्ट २०२५ रोजी होत आहे. गेली अनेक वर्ष या सोसायटीमध्ये सेना व वर्कर्स युनियनचे प्राबल्य राहत आले आहे.

१५९३ सभासद असलेल्या या क्रेडिट सोसायटीचे अकराशे कोटी रूपयाच्या वर भाग भांडवल असून ठेवीही जवळपास एक हजार कोटीच्या जवळपास आहेत.
बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना कमी व्याजदराने अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे, गरजेनुसार त्यांना तात्काळ कर्ज मंजूर करणे, दहा लाखापर्यंत मेडिकल साठी विमा उतरवणे. क्रेडिट सोसायटीच्या कारभारात पारदर्शकता आणणे व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविणे या साठी सहकार विकास पॅनल या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या सोबत वारंवार बैठक घेऊन बेस्ट कामगारांचा कोविड भत्ता भाजपा बेस्ट कामगार संघाचे अथक प्रयत्नाने आज कामगारांना मिळत आहे त्याचा आम्हाला विशेष अभिमान आहे.

भाजपा बेस्ट कर्मचारी संघ या निवडणुकीत कर्मचाऱ्यांची युनियन म्हणून पुढाकार घेत असला तरी भारतीय जनता पार्टीचा या निवडणुकीशी संबंध नाही हे आम्ही आपणास येथे मुद्दाम अधोरेखित करत आहोत असे सहकार विकास पॅनल चे सरचिटणीस गजानन नागे यांनी सांगितले.

विविध जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन विद्युत पुरवठा व वाहतूक क्षेत्रातील होतकरू व कर्तबगार धाडसी तरुणांना घेऊन सहकार विकास पॅनल तयार करण्यात आलेला आहे. पतपेढीतील यापूर्वीच्या कारभाराला कर्मचारी कंटाळलेले असून बेस्ट उपक्रमातील कर्मचारी पर्याय शोधत होते. प्रस्थापितांना उत्तम पर्याय म्हणून सहकार विकास पॅनल ही निवडणूक लढवीत आहे. हा पॅनल पूर्णपणे अराजकीय स्वरुपाचा असून कोणत्याही पक्षाचा या पॅनलशी संबंध नाही अशी माहिती पॅनलच्या सर्व पदाधिकारी यांनी दिली.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *