बेस्टकडून तिकिट दरात दुप्पट वाढ

 बेस्टकडून तिकिट दरात दुप्पट वाढ

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाच्या झळा वाढत असताना आता सर्वसामान्य मुंबईकरांना महागाईच्या झळाही बसणार आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचणाऱ्या बेस्ट बस चे तिकिटदर आता दुप्पट वाढवण्यात आले आहेत. आता ५ रुपयांना मिळणारे तिकीट १० रुपये, तर एसी बसचे ६ रुपयांचे तिकीट थेट १२ रुपये इतके होणार आहे, तर मासिक पासात तब्बल ३५० रुपयांची वाढ होणार आहे. सुमारे ३१.५ लाख प्रवासी बेस्ट सेवेचा लाभ घेतात. लोकसभा आणि विधासभांच्या निवडणुकांमध्ये नागरिक नाराज होऊ नयेत म्हणून ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती.

पालिका प्रशासनाच्या मंजुरीनंतर वाहतूक विभाग व नगरविकास विभाग या दोघांची मंजुरी मिळताच तिकीट दरवाढ लागू करण्यात येणार आहे. पुढील एक ते दोन दिवसांत वाहतूक विभाग व नगर विकास विभागाची मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली असून आर्थिक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. हे दुष्टचक्र रोखण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव आणल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *