बेस्ट सेवेतील सेवानिवृत्तांना प्रलंबित ग्रॅच्युइटी,देणी त्वरित द्यावी

 बेस्ट सेवेतील सेवानिवृत्तांना प्रलंबित ग्रॅच्युइटी,देणी त्वरित द्यावी

मुंबई, 27 :
मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमातील प्रलंबित थकीत असलेली ग्रॅज्युइटी(उपदान) व इतर देणी त्वरीत मिळावी यासाठी बेस्ट उपक्रमामधील परिवहन व विद्युत सेवेतील सेवानिवृत अधिकारी, कर्मचारी यांनी मंगळवारपासून आझाद मैदानात साखळी बेमुदत उपोषण सुरु केले.याचे बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समिती अध्यक्ष भाई पानवडीकर नेतृत्व करीत आहेत.

मुंबईकरांना वीजपुरवठा व परिवहन या बेस्ट उपक्रमातून ३०ते ३५ वर्षे विविध पदावर सेवा करून अधिकारी,कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.परंतु;सेवानिवृत्तीनंतर बेस्टमधील अधिकारी, कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधी (पी.एफ) वगळता हक्काची व कायदेशीर देणी बेस्ट प्रशासनाने दिलेली नाही.यात ग्रज्युईटी ,प्रवासभत्ता, दिवाळी बोनस, शिल्लक रजेचे पैसे,कोविड भत्ता,२०१६ ते २१ या पाच वर्षातील वेतन कराराची थकबाकी आदीचा समावेश आहे.

एक आॅक्टोबर २०२२ ते १ मे २०२४ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या ३ हजार कर्मचार्यांना ५८ टक्के रकमेचे प्रदान केले आहे.अजून ४२ टक्के बाकी आहे.यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. १ जून २०२४ पासून ते आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे ३५०० अधिकारी,कर्मचार्यांची देणी दिलेली नाहीत.त्यासाठी १२०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.अशी एकूण १५०० कोटी रुपयांचा निधी राज्यसरकारने द्यावा.कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त झाल्यावर महिन्याच्या आत ग्रॅज्युईटी प्रदान करणे बंधनकारक आहे.अन्यथा या रक्कमेवर १० टक्के व्याज देणे ही संस्थेची जबाबदारी कायदयाने बंधनकारक आहे असे असून सुध्दा न्यायालय व प्रशासनाकडे लढाई लढावी लागते. आजपर्यंत सुमारे २०० सेवानिवृत्त कर्मचार्यांचे निधन झाले आहे. त्यांना देणी मिळालेली नाहीत,.असे सेवानिवृत्तांनी यावेळी सांगितले.

यावेळी संघर्ष समिती अध्यक्ष भाई पानवडीकर म्हणाले,या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने साखळी उपोषणाचे पाऊल उचलले.जो पर्यंत या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तापर्यत उपोषण सुरु राहिल. उपोषणात श्रीपत पंदिरकर,विजय पांडे,सुरेश जागडे,भिमाजी गायकवाड,चंद्रकांत सावंत यांच्यासह बेस्ट सेवानिवृत्तांचा सहभाग होता.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *