बेंबळा प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले.

यवतमाळ दि १४ — यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 25 सेंमी ने उघडण्यात आले आहेत. या माध्यमातून 126 घनमीटर प्रति सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीकाठी अनावश्यक वावर टाळावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ यांनी केले आहे.ML/ML/MS