हजरत ख्वाजा मीरासाहेब यांच्या उरुसाचा प्रारंभ

 हजरत ख्वाजा मीरासाहेब यांच्या उरुसाचा प्रारंभ

सांगली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या 648 व्या उरुसाला आज पासून प्रारंभ झाला. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून मिरजेतील मीरा साहेबांचा उरूस प्रसिद्ध आहे.

चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण करून या उरुसास प्रारंभ झाला. महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येथे हजेरी लावतात.

मिरजेतील सातपुते वाडा येथे पूर्व संध्येला गंधरात्र पार पडते. पहाटे सातपुते वाडा येथून सवाद्य मिरवणूक निघते. त्यानंतर गलेफ अर्पण करण्यात येतो. मीरासाहेब दर्ग्याच्या उरूसामध्ये संगीत महोत्सव आयोजित केला जातो. अनेक सुप्रसिद्ध कलाकार या ठिकाणी येऊन आपली संगीत सेवा बजावतात.

हजरत ख्वाजा शामना मिरासाहेब हें सुफी संत होऊन गेले सर्वधर्म समभाव आणि मानवतावादाच्या प्रसार मिरा साहेबांनी आपल्या हयातीत केला. त्यांच्या शिकवणुकीने अनेक भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे.Beginning of Urusa of Hazrat Khwaja Meerasaheb

ML/KA/PGB
16 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *