दख्खनचा राजा जोतिबाच्या खेट्यांना सुरुवात

 दख्खनचा राजा जोतिबाच्या खेट्यांना सुरुवात

कोल्हापूर दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जोतिबाच्या नावानं चांगभलं च्या गजरात काल जोतिबाच्या पहिल्या खेट्याला सुरूवात झाली. कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवासानं रविवारी जोतिबाचे दर्शन घेतलं जातं , कोल्हापूरच्या अंबाबाईनं पायी अनवाणी चालत येवून श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात.

भक्तीमय वातावरण

कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र , कर्नाटक राज्यातील भाविक ही मोठया श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत. जोतिबाची सरदारी रूपात अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती .
काल रविवारी पहिला खेटा मोठया भक्तीमय वातावरणात साजरा झाला. कोल्हापूर ,वडणगे , निगवे , कुशिरे ‘ गाय मुख मार्गे जोतिबा मंदिरात भाविक चालत आले. जोतिबा डोंगरच्या पाय वाटा भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्या. चांगभलं चा गजर डोंगर घाटातून घुमू लागला.

रविवार मध्यरात्रीपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काल पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले.

सकाळी ८ते९ अभिषेक, सकाळी ११ वाजता धुपारती,दुपारी ३ ते४ अभिषेक, रात्री पालखी सोहळा सपन्न झाला. जोतिबा डोंगरावर दोन ते तीन लाख भाविक येतील, अशी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे देवस्थान व्यवस्थापक दीपक म्हेत्तर यांनी सांगितलं.यावेळी ड्रोन सह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ML/KA/SL

13 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *