पर्यावरणपूरक पद्धतीनं मधाचं पोळे काढण्यासाठी मधमाशी मित्रांची तुकडी
कोल्हापूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मधमाशांना हानी न पोहोचवता पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 25 मधमाशी bees मित्रांची तुकडी तयार झाली आहे.
नाबार्ड, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ तसंच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित तीन दिवस चाललेल्या मधमाशी मित्र प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप करण्यात आला त्यावेळी हे स्पष्ट झाले.
सहभागी प्रशिक्षणार्थीना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते मधमाशी मित्र प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
मध आणि रेशीम honey उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मधाचं गाव आणि रेशमाचं गाव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचं रेखावार यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, मधमाशांना हानी न पोहोचवता, मधमाशांचं संवर्धन करीत पर्यावरणपूरक पद्धतीनं मध संकलन करण्याची माहिती देण्यासाठी आयोजित या कार्यशाळेतील महिलांचा सहभाग कौतुकास्पद बाब आहे. यातून शेतकऱ्यांचा मध उद्योगाच्या जोडधंद्यातून विकास साधण्यास मदत होईल.
केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण अनुसंधान विभागाचे सहायक संचालक सुनील पोखरे यांनी हा उपक्रम देशातील अभिनव उपक्रम असून कोल्हापूरकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं.
शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील आग्या मधमाशांचे पोळे honey comb पर्यावरण पूरक पद्धतीनं काढून मधमाशी मित्र उपक्रमाची सुरवात झाली.
यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. एस.एन.सपली, संगणकशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. कविता ओझा आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ML/KA/PGB
24 Nov 2022