या भाजपशासित राज्यात लागू झाली गोमांस बंदी
दिसपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्यानेच सत्तेत आलेल्या भाजपशासित आसाम राज्यात आता गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. सध्याच्या आसाम गोरक्षण संरक्षण कायदा 2021 नुसार हिंदू, जैन, शीख प्रार्थनास्थळांपासून 5 किमी अंतरावर गोमांस विक्री किंवा खरेदीवर बंदी आहे. या बंदीची व्याप्ती आता हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आसामच्या रेस्टॉरंट, हॉटेल आणि सार्वजनिक कार्यक्रमात गोमांस सेवनावर बंदी घालण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी हा निर्णय घेतला आहे.
‘आसामच्या कोणत्याही रेस्टॉरंट, हॉटेल तसंच सार्वजनिक कार्यक्रम आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस सेवन केलं जाणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. आजपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. याआधी मंदिराजवळ गोमांस सेवनावर आम्ही बंदी घातली होती, आता या बंदीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता तुम्हाला आसाममधल्या कोणत्याही हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस सेवन करता येणार नाही’, असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा म्हणाले आहेत.
SL/ML/SL
5 Dec. 2024