बीड जिल्ह्यातील १७ धरणे भरली; ४८ मंडळात अतिवृष्टी

 बीड जिल्ह्यातील १७ धरणे भरली; ४८ मंडळात अतिवृष्टी

बीड दि २९ – बीड जिल्ह्यातील १७ -धरणे १०० टक्के भरली असून, २ धरणे ही ९०टक्क्यांच्या आसपास आहे. केवळ माजलगावमधून विसर्ग करण्यात येत आहे. वडवणी तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. तेथे आवश्यक ती मदत पुरविली जात आहे. एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक बीडमध्ये सज्ज असून, ते बचावकार्य करीत आहेत. सुमारे ४८ मंडळात काल अतिवृष्टी झाली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, परिस्थिती उदभवल्यास त्यांना स्थानांतरित करण्यात येईल. आष्टीमधून ६० नागरिकांना सुरक्षित हलविण्यात आले आहे. सप्टेंबरपासून २५६७ कुटुंबांना सुरक्षित स्थलांतरित करावे लागले. १० लोकांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी ८ कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *