बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस, नदी नाल्यांना पूर….

बीड दि १५– जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आला आहे. नगर बीड रस्त्यावरील धानोरा येथील कांबळी तलाव भरला असून पुलावरून पाणी सुरू आहे. बीड कडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील नद्यांना पूर आले आहेत. दौलवडगाव महसूल मंडळात आणि गर्भगिरी डोंगर डोंगर रांगांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने नद्या वाहत्या झाल्या, उंदरखेल येथील प्रकल्प भरला आहे. देवी निमगावच्या नदीला पूर आला आहे. पुलावरून पाणी चालू आहे त्यामुळे देविनिमगाव धामणगाव रोड बंद झाला आहे.ML/ML/MS