बीड जिल्ह्यात यंदा सर्वत्र अतिवृष्टी….

बीड दि १४ — जिल्ह्यात मागील २४ तासांत एकूण सरासरी ४४.४ मी.मी. पर्जन्यमान झाले आहे. एकूण ८६ मंडळांपैकी १६ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद आहे. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस गेवराई तालुक्यामध्ये 91.6 मी.मी. झाल्याची नोंद आहे. यानंतर शिरूर कासार तालुक्यामध्ये 86.7 मी. मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील बीड तालुक्यामधील नवगण राजुरी, नाळवंडी, चऱ्हाटा, पारगाव सिरस, पाटोदा तालुक्यातील पाटोदा, थेरला, गेवराई तालुक्यातील पिंपळगाव, शिरूर तालुक्यातील शिरूर कासार, तिंतरवणी अशा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.ML/ML/MS