बीड जिल्ह्यात पुन्हा पाऊस; मांजरा धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले..

 बीड जिल्ह्यात पुन्हा पाऊस; मांजरा धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले..

बीड दि २८…बीड जिल्ह्यातील काही भागात पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय. यामुळे बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या, बीडच्या धनेगाव येथील मांजरा धरणाचे 6 दरवाजे पुन्हा एकदा उघडले असून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीत सुरू आहे. यामुळे बीड, लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मांजरा प्रकल्प सध्या ९९.२१ % क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने ६ दरवाजे उघडले आहेत. याद्वारे ०.२५ मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात १०हजार ४८२.८४ क्यूसेक्स (२९६.८८क्यूमेक्स ) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

दरम्यान मांजरा नदी काठावरील गावे, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पूरनियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *