बीड जिल्ह्यात ढगफुटी
सदृश परिस्थिती, गोदावरी – सरस्वती दुथडी भरून वाहिल्या…!

बीड दि ९… बीड जिल्ह्यातल्या माजलगांव तालुक्यातील उमरी, मोगरा परिसरामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने पहिल्याच पावसात गोदावरी व सरस्वती नदीला पूर आल्याने या भागाचा पाणीप्रश्न मिटला आहे.
माजलगाव तालुक्यातील उमरी, मोगरा, शुक्लतीर्थ लिमगाव, डाके पिंपरी, साळेगाव, कोथळा, जीवनापूर, लोणगाव, आलापूर, बेलोरा, सिमरी पारगाव यासह इतर सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने नदी – नाले वाहून गोदावरी व सरस्वती नदीला पूर आल्याने पाणीप्रश्न मिटल्याने व पहिलाच पाऊस जोरात झाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे. ML/ML/MS