बीडच्या अनेक भागात जोरदार पावसाचे हजेरी, गोदावरी नदीला पूर…

बीड दि ८…दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर बीडच्या वडवणी,माजलगाव तालुक्यासह अनेक भागात काल सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला होता.माजलगाव तालुक्यातील मोगरा गावातील गोदावरी नदीला पूर आला. दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखवाला आहे. त्याचबरोबर शेती पिकांना मोठा जीवदान मिळाला आहे आजही बीड जिल्ह्यात काही ठिकाणी धुवाधार पाऊस चालू आहे. ML/ML/MS