बीड जिल्ह्यात रात्री काही भागात पावसाची दमदार हजेरी…!

बीड दि २२… बीड जिल्ह्यात मागील एका महिन्यापासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं होतं . मात्र बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यासह अनेक भागात रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.पावसाची हजेरी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी जीवनदायी ठरलेला आहे, पाऊस झाल्यानंतर आता शेतकरी पुन्हा शेतीच्या कामात मग्न झाला आहे. माजलगाव, पाटोदा, आष्टी, गेवराई, वडवणी, बीड, धारूर, केज, अंबाजोगाई,परळी तालुक्यात सर्वत्र शेतीच्या कामांना वेग आलाय नक्कीच या पावसाने शेतकरी राजा सुखावलेला आहे. ML/ML/MS