बीड भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची पक्षाला सोडचिठ्ठी
बीड, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली आहे. समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज संघर्षयोद्धा जनसंपर्क कार्यालय बीड येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने भारतीय जनता पार्टीला सोडचिट्ठी देऊन भाजप मुक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील भाजपला धक्का बसला आहे.
ML/ML/SL
20 Oct. 2024