बीड भाजपा जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख
बीड, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे या रिक्तपदावर येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते शंकर देशमुख यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीड जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्यासंबंधीचे पत्र दिले आहे. देशमुख यांच्या निवडीबद्दल कडा शहरात फटाक्यांची अतिषबाजी करुन समर्थकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आष्टी तालुक्यातील कडा येथील शंकर अनंतराव देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान बीड जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समवेत त्यांनी काम केले आहे. तसेच माजीमंत्री पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.
बीड भाजपा जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख
ML/ML/PGB
27 Oct 2024