दिलदार BCCI! ऑलिंम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना ८.५ कोटींची मदत
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिसमध्ये 26 जुलैपासून ऑलिम्पिक 2024 स्पर्धा खेळली जाणार आहे. यात भारतीय खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. यासाठी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मदतीचा हात पुढे केला आहे. BCCIचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे की BCCIकडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) 8.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतूक होताना दिसत आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या अतुलनीय खेळाडूंना बीसीसीआय पाठिंबा देईल हे जाहीर करताना मला अभिमान वाटतो, असं जय शहा यांनी म्हटलं आहे. आम्ही ऑलिम्पिक मोहिमेसाठी IOA ला 8.5 कोटी रुपये देत आहोत, अशी घोषणा बीसीसीआय सचिव जय शहा यांनी केली. त्यामुळे आता बीसीसीआयचं कौतूक होताना दिसत आहे.पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
ML/ML/PGB 22 July 2024