सचिनला देण्यात येणार BCCI जीवनगौरव पुरस्कार

 सचिनला देण्यात येणार BCCI जीवनगौरव पुरस्कार

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

BCCI कडून उद्या सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार देणार आहे. BBCI च्या मुख्य कार्यालयात होणाऱ्या वार्षिक समारंभात सचिनला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळवणारा सचिन हा 31 वा क्रिकेटपटू ठरणार आहे. यापूर्वी 2023 मध्ये हा पुरस्कार भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देण्यात आला होता.

आपल्या काळातील महान फलंदाज मानला जाणारा तेंडुलकर प्रत्येक परिस्थितीत सहज धावा काढण्यासाठी ओळखला जात असे. त्याने वयाच्या 16 व्या वर्षी 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि पुढील 20 वर्षांत त्याने जगभरातील गोलंदाजांविरुद्ध धावा केल्या. कसोटी आणि एकदिवसीय मिळून 100 शतके करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तेंडुलकर भारताच्या 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा प्रमुख सदस्य होता. हा त्याचा विक्रमी सहावा आणि शेवटचा विश्वचषक ठरला.

51 वर्षीय तेंडुलकरने भारतासाठी 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी आणि वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सचिनने 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा केल्या आहेत, तर 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. सचिनने एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामनाही खेळला आहे.

SL/ML/SL
31 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *