BCCI ने या क्रिकेटपटूवर घातली दोन वर्षांसाठी बंदी

 BCCI ने या क्रिकेटपटूवर घातली दोन वर्षांसाठी बंदी

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर विश्वचषकाचा जल्लोश सुरु असताना जम्मू-काश्मीरचा क्रिकेटपटू वंशज शर्मा अडचणीत सापडला आहे. वेगवेगळ्या जन्मतारीखांसह दोन वेगवेगळी जन्म प्रमाणपत्र दिल्याबद्दल त्याला दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. वंशज हा मूळचा जम्मूमधील बिश्नाह येथील राहणारा आहे, पण तो खेळण्यासाठी बिहारमध्ये गेला होता. बिहारच्या संघाकडून खेळत असताना त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या संघटनेने अधिकृतपणे सांगितले की, वंशज शर्मावर २७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सर्व BCCI टूर्नामेंटमधून दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. बंदीनंतर तो कोणत्याही वयोगटातील स्पर्धांमध्ये नाही.

“वंशज शर्मा हा सध्या बिहार क्रिकेट असोसिएशनसाठी खेळत आहे आणि जम्मूच्या संघासाठी नाही, हे मी प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो. आम्ही त्याला २०२०-२१ च्या हंगामात प्रथम १९ वर्षांखालील खेळाडू म्हणून नोंदणीकृत केले होते, परंतु तो कधीही जम्मू-काश्मीरच्या संघाकडून खेळला नाही. नंतर तो बिहार क्रिकेट असोसिएशनमध्ये सामील झाला. त्यांनी त्याची वेगळ्या जन्मतारीखसह २३ वर्षांखालील खेळाडू म्हणून नोंदणी केली. बीसीसीआयला ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. एकापेक्षा जास्त जन्म प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल त्याच्यावर बीसीसीआयने बंदी घातली आहे,” असे ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांनी सांगितले. अनिल गुप्ता हे जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) चे प्रमुख आहेत.

SL/KA/SL

31 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *