पंतप्रधान मोदींवर डॉक्युमेंटरी बनवण्या प्रकरणी BBC ला समन्स

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील डॉक्यूमेंट्रीमुळे न्यायव्यवस्था आणि पंतप्रधानांसह भारताच्या प्रतिष्ठेवर परिणाम होत असल्याचा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला (BBC) मानहानीच्या दाव्यात समन्स जारी केले आहे.. जस्टिस ऑन ट्रायल या गुजरातस्थित एनजीओने दाखल केलेल्या दाव्यात न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी समन्स जारी केले आहे. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी सप्टेंबर महिन्यात होणार आहे.न्यायालयाने म्हटले की, “असा युक्तिवाद करण्यात आला आहे की डॉक्युमेंट्री देश आणि न्यायपालिका आणि पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेवर बदनामीकारक आरोप करते. प्रतिवादींना नोटीस जारी करा.”
दोन भागांच्या माहितीपटामुळे न्यायव्यवस्थेसह देशाची बदनामी झाली आहे, असा युक्तिवाद एनजीओतर्फे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केला. RSS आणि विश्व हिंदू परिषदेशी संबंधित वादग्रस्त माहितीपट किंवा इतर कोणताही कंटेंट प्रकाशित केल्याबद्दल भाजप नेते बिनय कुमार सिंह यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात खालच्या न्यायालयाने अलीकडेच बीबीसी, विकिमीडिया फाऊंडेशन आणि इंटरनेट आर्काइव्हला समन्स बजावले होते. त्याचे प्रसारण थांबवण्याची मागणी करण्यात आली होती.
डॉक्युमेंटरी वादग्रस्त ठरण्याचे कारण
BBCने ‘India: The Modi Question’ नावाने दोन भागात एक माहितीपट प्रदर्शित केला होता. हा माहितीपट यूट्युबवरही रिलीज करण्यात आला होता, मात्र वाद उद्भवल्याने यूट्युबवरून तो काढण्यात आला. या सीरीजच्या सुरुवातीस माहिती देताना सांगण्यात आलं आहे की, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत मुस्लीम अल्पसंख्यांक यांच्यातील तणावावर एक नजर, २००२ च्या दंगलीतील त्यांच्या भूमिकेबद्दल दाव्यांचा तपास, ज्यामध्ये हजारो लोक मारले गेले.
SL/KA/SL
22 May 2023