आता तुकडेबंदीची अट रद्द, सातबारा होणार नावावर
नागपूर दि ९ : राज्यातील शहरी भागातील प्लॉटिंग करताना अथवा जमिनीचा तुकडा विकत घेताना तुकडेबंदी आणि गुंठेवारी कायद्याचा भंग करण्यात आलेल्या घर अथवा जमीन मालकांना संबंधित मालमत्ता त्यांच्या नावे होण्यासाठी जमीन महसूल कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या सुधारणेच्या मुळे १५ ऑक्टोबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२५ दरम्यानच्याच अशा व्यवहारांचा समावेश असेल त्यानंतरच्या व्यवहारांना या सुधारणेचा फायदा मिळणार नाही अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
या विधेयकामुळे सर्व जमीन धारकांची नावे सात बारा वर येतील , ले आऊट मंजुरीनंतर त्यांचे सात बारा देखील वेगळे करण्यात येतील , शहरी विकासाचे सर्व कायदे मात्र लागुच राहतील त्यात या विधेयकामुळे काही बदल होणार नाही असं मंत्री म्हणाले. शहरी भागातील कोणत्याही आरक्षणाचा झालेला भंग, अनधिकृत बांधकामे यामुळे नियमित होणार नाहीत. सात बारावर नावे घेण्यासाठी कोणतेही शुल्क अथवा दंड आकारणी होणार नाही, ग्रामीण भागातील शेतजमिनींसाठी मात्र याचा फायदा घेता येणार नाही, केवळ रहिवासी क्षेत्र घोषित झालेल्या भागातच हे लागू करण्यात येईल, याचा फायदा राज्यातील साठ लाख नागरिकांना होईल असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.ML/ML/MS