खरडलेल्या शेतजमिनीसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, कंकर मोफत !

 खरडलेल्या शेतजमिनीसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, कंकर मोफत !

​मुंबई, दि. १४ :​ अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर मोफत पुरवण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचे परिपत्रक महसूलविभागाने आज जारी केले. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुरामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन पुन्हा लागवडी योग्य व सुपीक करण्यासाठी लागणाऱ्या माती, गाळ, मुरूम, कंकर या गौण खनिजांवरील स्वामित्वधन (रॉयल्टी) माफीच्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

​राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतपिकांचे नुकसान झालेच. शिवाय, मनुष्य व पशुहानी यासह शेतजमीन खरडून जाणे, अतिरिक्त गाळ साठणे आणि जमिनीचा सुपीकस्तर वाहून जाण्याच्या घटना घडल्या. अशा जमिनी पडीक पडत असून, त्यांना पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांना गौण खनिजांची आवश्यकता असते. ​नैसर्गिक आपत्तीग्रस्त व्यक्तींना घर, गुरांचा गोठा, शेत व विहीर यांसाठी आवश्यक पाच ब्रास गौण खनिजाच्या वापरासाठी स्वामित्वधनातून सूट मिळेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे जाईल.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *