बाॅक्साईट उत्खनन पुन्हा एकदा सुरु
कोल्हापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा बाॅक्साईट उत्खनन (Bauxite Mining) सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात औद्योगिक वसाहत सुरु करण्यासाठी 18 गावे वगळण्यात यावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. भुदरगडमधील देवकेवाडीत औद्योगिक वसाहत निर्मितीचा विचार आहे यासाठी 18 गावे बघावेत अशी मागणी केंद्राकडे केली आहे.
केंद्र सरकारच्या अधिसूचनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील 184 गावांचा संवेदनशील क्षेत्रात समावेश आहेत. या संवेदनशील क्षेत्रांपैकी 31 गावे वगळावेत अशी राज्य सरकारची मागणी आहे. यापैकी 17 गावात बॉक्साईटचे उत्खन सुरू करण्यासाठी एका गावात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी आणि उर्वरित 13 गावे संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याने ती सर्व गावे वगळण्याची मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आल्यास कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा बॉक्साईट उत्खनन सुरु होणार आहे.Bauxite mining resumes once again
ML/KA/PGB
10 Jan. 2023