बॅटमॅन फेम प्रसिद्ध अभिनेता वेल किल्मर यांचं निधन

सुपरहिरो बॅटमॅनची क्रेझ आजही सगळ्यांना आहे. हॉलिवूडमध्ये याच बॅटमॅनच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेले अभिनेते वेल किल्मर (६५)यांचं मंगळवारी १ एप्रिलला लॉस एँजिलिसमध्ये निधन झालं. निमोनिया झाल्याने वेल यांची प्राणज्योत मालवली. वेल यांची मुलगी मर्सिडीज किल्मरने वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी सर्वांना सांगितली. अभिनेते किल्मर यांना त्यांच्या ‘बॅटमॅन फॉरएव्हर’, ‘टॉप गन’ आणि ‘टोम्बस्टोन’ यांसारख्या सिनेमांसाठी ओळखले जाते. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.