संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान….

 संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान….

सातारा, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  संत श्री ज्ञानेश्वर माऊलीची पालखी वाल्हे येथून निघून तिने आज सातारा जिल्हा्यातील लोणंद गावामध्ये प्रवेश केला. संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पादुकांना पारंपारिक पद्धतीने नीरा नदीत स्नान घालण्यात आले. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीच्या जयघोषात सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये माऊलीच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी मान्यवरांनी माऊलीच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी प्रथमच जिल्हा पोलीसांच्या बॅण्डपथकानं पालखीला स्वागतपर मानवंदना दिली. पालखीचा सातारा जिल्ह्यातील प्रवास सुरक्षित होण्यासाठी जिल्हाप्रशासनाने मोठी तयारी केली असून सुमारे १६०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
लोणंद येथे माऊलीच्या पालखीचा दोन दिवस मुक्काम असून वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केलेल्या आहेत.

ML/KA/PGB
18 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *