वाढीव खर्चातील तफावत कंत्राटदाराला देत सरकारने डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा मार्ग मोकळा करावा.
उपाध्यक्ष अण्णा बनसोडे याचे आश्वासन..

 वाढीव खर्चातील तफावत कंत्राटदाराला देत सरकारने डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा मार्ग मोकळा करावा.उपाध्यक्ष अण्णा बनसोडे याचे आश्वासन..

मुंबई प्रतिनिधी
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

या पाहणीवेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी व इतर शिष्टमंडळ उपस्थित होते. २०१८ साली या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले होते. मात्र, २०२६ पर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने शासनाने किंमतीतील तफावत तातडीने कंत्राटदाराला देण्याची गरज असल्याचे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात त्यांनी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रकल्पातील आर्थिक तफावत दूर करण्यासोबतच MMRDA कडून कंत्राटदारांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, ३५० फूट उंचीच्या या भव्य पुतळ्यापैकी सध्या सुमारे ५० फूट काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे बूट आणि पॅंटचा काही भाग तयार झाला असून उर्वरित काम गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू आहे. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र स्मारकाच्या कामाला २०२८ उजाडणार असल्याचे चित्र आहे.

या स्मारकाबाबत बोलताना अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे भविष्यात एक मोठे पर्यटन आणि प्रेरणास्थळ ठरणार आहे. देश-विदेशातील लाखो अनुयायांसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठिकाण ठरेल, तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणूनही ते ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *