IBPS बँकिंग सेक्टरमध्ये क्लर्कच्या पदासाठी भरती

 IBPS बँकिंग सेक्टरमध्ये क्लर्कच्या पदासाठी भरती

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आयबीपीएसने (IBPS) बँकिंग सेक्टरमध्ये क्लर्कच्या पदासाठी अर्ज प्रक्रिया करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. या संदर्भात आयबीपीएसने आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देखील जारी केली आहे. आता उमेदवार २८ जुलै २०२४ पर्यंत आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै होती, ती आता वाढवण्यात आली आहे.

देशभरातील ११ विविध बँकांमध्ये एकूण ६,१४८ लिपिक पदांची भरती होणार आहे. या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब आणि सिंध बँक यांचा समावेश आहे.

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.- CRP Clerks वर क्लिक करा.- यानंतर अर्ज प्रक्रियेच्या लिंकवर क्लिक करा.- यानंतर तुम्हाला तुमचे अकाउंट बनवावे लागेल.- लॉग इन करून अॅप्लिकेशन फॉर्म भरा.- मागितलेले दस्तावेज अपलोड करून अर्ज शुल्क भरा.- पेजला डाउनलोड करून भविष्यासाठी त्याची प्रत स्वतःजवळ ठेवावी

PGB/ML/PGB 26 July 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *