बंजारा सांस्कृतिक दिवाळी महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि २४
शिवसेना कुलाबा विधानसभा संघटक दीपक पवार यांच्या वतीने कुलाबा येथे बंजारा समाजातील भगिनींसाठी भव्य बंजारा दीपावली महोत्सवाचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात दिवाळी फराळाचे आणि मिठाईचे वाटप तसेच महिलांसोबत फटाक्यांची आतिषबाजी करून दीपावली साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात बंजारा महिलांनी नृत्य आणि गाणे सादर करून उपस्थित नागरिकांची मने जिंकली. या समारंभात कोर समाजाच्या लहान मुलांनी तसेच मुलींनी देखील बंजारा समाजातील गीत आणि नृत्य सादर केले. या कार्यक्रमात बंजारा समाजाचे दैवत सेवालाल महाराज यांचे गाणे आणि भजन सादर करण्यात आले. या कार्यक्रमात बंजारा समाजाबरोबर इतर समाजही मोठ्या संख्येने या दीपावली महोत्सवांमध्ये उपस्थित होता.
दीपक पवार हे नेहमी समाजात चांगले कार्य करत असतात. वेळी त्यांनी दीपावलीनिमित्त गौर बंजारा समाजाचा सामूहिक दीपावली स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे बंजारा समाजातील माता-भगिनींना आपली कला सादर करता आली असून दिवाळी त्यांच्यासोबत आम्हाला साजरी करायला मिळाली हा आमच्यासाठी फार भाग्याचा क्षण आहे. यापुढे देखील त्यांनी आपले समाजकार्य असेच सुरू ठेवावे अशी माहिती शिवसेनेचे कुलाबा विधानसभा विभाग प्रमुख गणेश सानप यांनी आपल्या भाषणातून दिली.यावेळी महिला शाखा संघटिका तेजल दिपक पवार, समन्वयक गणेश गावणकर , उपविभागप्रमुख रोहित गुप्ता ,संतोष पवार, शाखाप्रमुख जगन्नाथ धनु, महिला शाखा प्रमुख रुबीना शेख, दिपक कांबळी, गजानान मुळे आणि असंख्य शिवसैनिक उपस्तीत होते.KK/ML/MS