पुणे शहर बंगाली क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न

 पुणे शहर बंगाली क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न

पुणे, 4 : पुणे शहर बंगाली क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धा नुकतीच टेबेकर मैदान, बिबेवाडी येथे संपन्न झाली. या स्पर्धेच्या समारोपा वेळी आमदार हेमंत रासने ,नगरसेवक विशाल धनवडे, सुब्रतो मजुमदार,पुणे शहर बंगाली क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नयन शेख, सेक्रेटरी अब्बास शेख,कार्याध्यक्ष राफेल शेख, सदस्य जर्सील शेख, हबिब मंडलिक, संजय पाल आणि बंगाली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून बंगाली बांधव पुणे शहरात आणि महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने राहत आहे. येथे राहत असताना ते आपले सण, उत्सव हे एकत्र येवून साजरे करत आहेत. इतकेच नव्हे तर यातील क्रिकेट प्रेमींकडून या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात येत आहे. ही खरच वाखाण्या जोगी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आशा प्रत्येक उपक्रमात पुणेकर म्हणून आम्ही त्यांचा पाठीशी उभे आहोत.

नयन शेख म्हणाले, कलकत्ता वरून आलेले सर्व कामगार वर्गे एकत्र येवून ही स्पर्धा भरवतात. कामगारांचे मनोरंजन आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी ही स्पर्धा भरवली जाते. पुणे शहर बंगाली क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेचे २४ वे वर्ष आहे. या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले आहेत. तर या स्पर्धेत खेळण्यासाठी पुणे शहर, महाराष्ट्रासह कलकत्ता मधून देखील मोठ मोठे खेळाडू आले आहेत. स्थानिक बंगाली समाज, कारागीर, व्यावसायिक यांचे बहुमूल्य सहकार्य या स्पर्धेसाठी केले जाते. या स्पर्धेसाठी जवळपास दोन महिने आधीपासून तयारी केली जाते.

या स्पर्धेतील विजेता संघ तळेगाव ह्रिद मझारे क्लब यांना एक लाखाचे पारितोषिक व स्मृतीचिन्ह, तर उपविजेता शेख ब्रदर्स ११ स्टार या संघास सत्तार हजाराचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह देण्यात आले.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *