बंडोबा झाले थंडोबा

 बंडोबा झाले थंडोबा

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरुध्द आरोपांची राळ उडवून देत निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविणारच अशी भाषा करणाऱ्या माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होऊन त्यात शिवतारे यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही चर्चा सकारात्मक झाली असून उद्या पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. शिवतारे यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आले. त्यामुळे उद्या आपण या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे शिवतारे यांनी ठरवले आहे. या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते.

ML/ML/SL

28 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *