बनावट किटकनाशक फवारणीमुळे शेतकर्याची कपाशी जळाली…

जालना दि २४: जालन्यात दोन एकरवरील उभ्या कपाशीवर बनावट किटकनाशक फवारल्याने संपुर्ण कपाशी जळून गेली असल्याचे समजले आहे, यामुळे शेतकर्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान शासनांने तात्काळ पिकांचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी व बनावट किटकनाशके विक्री करणार्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी घनसावंगी तालुक्यातील पारडगांव येथील शेतकरी रामेश्वर लिंबाजी सातपुते यांनी जिल्हा कृषी अधिकार्याकडे केली आहे.
घनसावंगी तालुक्यातील पारडगांव येथील धरती कृषी सेवा केंद्रावरुन शेतकरी रामेश्वर सातपुते यांनी 6 सप्टेंबर 2025 ला दोन एकर मध्ये लावलेल्या कपाशीवर फवारणीसाठी वेगवेगळ्या कंपनीची औषधी खरेदी केली होती. या शेतकर्याने ही औषधी आपल्या हिरव्यागार जोमाने डोलणार्यावर पिकावर फवारणी केली असता दुसर्याच दिवशी पिके लाल पडून संपुर्ण दोन एकर मधील कपाशी जळाल्याचा आरोप या शेतकर्याने केलाय.
दरम्यान, या शेतकऱ्याने जिल्हा कृषी अधिकार्यांकडे संबंधित कृषी सेवा केंद्र चालकावर कारवाई करून नुकसान भरपाईचीही मागणी केलीय. याप्रकरणानंतर कृषी अधिकाऱ्यांनी शेतातील बाधित कपाशी पिकांची पाहणी केली असून फवारणीचे सॅम्पल घेऊन त्यांनी तपासणीसाठी पाठविण्याचे अश्वासन दिले आहे.ML/ML/MS