बनाना पॅनकेक
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
२ केळी
१ वाटी कणीक
२ वाट्या तांदुळाची पिठी
१ अंडं
अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ/ साखर/ पिठीसाखर
अर्धी वाटी सुकामेवा ( बदाम, अक्रोड, अंजीर इत्यादी)
भाजण्यासाठी तूप
क्रमवार पाककृती:
कणीक आणि तांदुळाची पिठी एकत्र करून घ्या.
अंडं एका वाटीत फोडून फेटून घ्या.
सुकामेवा बारीक चिरून घ्या. अगदी लहान मुलं ( दीड-दोन वर्षांची ) खाणार असतील तर सरळ किसून घ्या.
कणीक आणि तांदुळाच्या पिठीत फेटलेलं अंडं, चिरलेला सुकामेवा, गूळ/ साखर यापैकी जे वापरत असाल ते घालून थोडं पाणी घालून हाताने गुठळ्या मोडून ओलसर भिजवा. पातळ अजिबात करू नका.
केळं मॅश करा. आणि वरच्या मिश्रणात घाला.
आता हळूहळू पाणी घालत घालत नीट ढवळत मिश्रण थोडं सैल करा.
साधारणपणे आपण केकचं बॅटर करतो तेवढं सैल मिश्रण पुरे. डावेने सहज तव्यावर घालता आलं पाहिजे.
तवा/ फ्रायपॅन तापवून घ्या. थोडं तूप घाला आणि त्यावर लहान लहान पॅनकेक घाला. तव्याच्या आकाराप्रमाणे २/३/४ एकावेळी होतील. झाकण ठेवा. एका बाजूने झाले की उलटा. खरपूस भाजून घ्या.
ML/ML/PGB
30 May 2024