या युरोपीयन देशात आजपासून बुरखा घालण्यावर बंदी

 या युरोपीयन देशात आजपासून बुरखा घालण्यावर बंदी

बर्न, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपमधील बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि बल्गेरियामध्ये बुरखा बंदी बाबत कायदे करण्यात आले आहेत. आजपासून स्वित्झर्लंडमध्ये महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा इतर कोणत्याही साधनाने चेहरा झाकण्यावर बंदी लागू केली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, या कायद्याचे उल्लंघन केल्यास 1000 स्विस फ्रँक्स म्हणजेच अंदाजे 96 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.

2021 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या सार्वमतामध्ये 51.21% नागरिकांनी बुरख्यावर बंदी घालण्याच्या बाजूने मतदान केले. यानंतर बुरख्यावरील बंदीबाबत कायदा करण्यात आला, जो आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2025 (नवीन वर्ष) पासून सुरू होत आहे. स्वित्झर्लंडपूर्वी . या कायद्यानंतर सार्वजनिक कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, रेस्टॉरंट, दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी महिलांना चेहरा पूर्णपणे झाकता येणार नाही.

2022 मध्ये राष्ट्रीय परिषदेने, स्विस संसदेचे कनिष्ठ सभागृह, चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याच्या कायद्यावर मतदान केले. या कालावधीत 151 सदस्यांनी बाजूने तर 29 सदस्यांनी विरोधात मतदान केले. त्यानंतर याबाबत कायदा करण्यात आला.

हा प्रस्ताव उजव्या विचारसरणीच्या स्विस पीपल्स पार्टीने (एसव्हीपी) मांडला होता, तर केंद्र आणि ग्रीन्स पक्ष याच्या विरोधात होते. काही लोकांचे म्हणणे आहे की हा कायदा मुस्लिम महिलांना अन्यायकारकपणे लक्ष्य करतो. या कायद्याचे समर्थन करणारे दावा करतात की, सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक मूल्य आणि सुरक्षिततेसाठी हे एक आवश्यक पाऊल आहे.

ल्युसर्न युनिव्हर्सिटीच्या 2021च्या संशोधनानुसार, स्वित्झर्लंडमध्ये क्वचितच कोणी बुरखा घालतो. येथे फक्त 30 महिला निकाब घालतात. 2021 पर्यंत, स्वित्झर्लंडच्या 8.6 दशलक्ष लोकसंख्येपैकी फक्त 5% मुस्लिम होते, त्यापैकी बहुतेक तुर्की, बोस्निया आणि कोसोवो येथील आहेत. यापूर्वी 2009 मध्ये जनमत चाचणीद्वारेच मिनार बांधण्यावर बंदी घालण्यात आली होती. एसव्हीपी पक्षानेही हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात हे मिनार इस्लामीकरणाचे लक्षण असल्याचे म्हटले होते.

SL/ML/SL

1 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *