लष्कराच्या ड्रोनमध्ये चिनी पार्ट्स वापरण्यास बंदी

 लष्कराच्या ड्रोनमध्ये चिनी पार्ट्स वापरण्यास बंदी

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेहमीच कुरापती काढत भारताला त्रस्त करणाऱ्या चीनपासून शक्य तेवढे सावध राहण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. देशांमधील तणावाचे वातावरण पाहता केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता चीनमध्ये बनवलेले पार्ट्स आता लष्करी वापरासाठी भारतात बनवलेल्या ड्रोनमध्ये वापरले जाणार नाहीत. केंद्र सरकारने यावर बंदी घातली आहे. अहवालानुसार, देशाच्या सुरक्षेशी संबंधित अधिकारी चिनी भागांच्या वापरामुळे धोक्यात येऊ शकते. ड्रोनची कम्युनिकेशन फंक्शन्स, कॅमेरे, रेडिओ ट्रान्समिशन आणि ऑपरेटिंग सॉफ्टवेअरचे भाग चीनमध्ये बनलेले आहेत.याचा वापर करुन परकीय गुप्तहेर संस्थांकडून भारताची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते.

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एडीई) चे संचालक वाय दिलीप यांच्या म्हणण्यानुसार, एडीई मानवरहित स्टेल्थ ड्रोन आणि उच्च उंचीच्या ड्रोनवर काम करत आहे. जरी यास बराच वेळ लागेल. तोपर्यंत ड्रोनची कमतरता भरून काढण्यासाठी भारत अमेरिकेकडून 31 MQ-9B ड्रोन खरेदी करणार आहे.लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी भारताने 2023-24 मध्ये सुमारे 16 लाख कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. यापैकी 75% देशामध्येच लष्कराशी संबंधित वस्तू बनवण्यासाठी राखीव आहे.

लष्कराला छोट्या ड्रोनचा पुरवठा करणाऱ्या न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, बेंगळुरूचे संस्थापक समीर जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या देशात बनवलेल्या ड्रोनमध्ये वापरण्यात येणारे 70% भाग चीनमध्ये बनलेले आहेत.लष्करासाठी खास ड्रोन बनवण्याचे तंत्रज्ञान आणि ज्ञान भारताकडे अजूनही नाही. यामुळेच आपण यासाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून आहोत.

बंदीमुळे स्थानिक ड्रोन निर्मात्यांवर खर्चाचा ताण वाढला आहे. या निर्णयामुळे ड्रोन बनवणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बंदीमुळे स्थानिक पातळीवर लष्करी ड्रोन बनवण्याचा खर्च वाढल्याचेही या उद्योगाची माहिती असलेल्या तज्ज्ञांचे मत आहे.

SL/KA/SL

8 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *