मुंबईत कोळसा तंदूर भट्टींवर बंदी, पालिका करणार कडक कारवाई

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेली बांधकामे, लाखोच्या संख्येने वाढणारी वाहने यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषणाला सामोरे जावे लागते. तसेच अन्य अनेक कारणांनी मुंबईची हवा मोठ्या प्रमाणात दुषित होते. पालिका प्रशासनाकडून प्रदुषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. आता मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना आता तंदूर रोटी बनवण्यासाठी तंदूर कोळसा भट्टीचा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने कोळसा भट्टी ऐवजी वेगळा पर्याय विविध हॉटेल मालक आणि चालकांना सूचवला आहे. खरंतर मुंबई हायकोर्टानेच याबाबत आदेश दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून याबाबत कारवाई केली जात आहे.
मुंबई महापालिकांनी हॉटेल चालकांना ७ जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टींना इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये बदलण्याची सूचना दिली आहे. या निर्णयाचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात परवाना रद्द करण्यापर्यंत कारवाई केली जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे
महापालिकेने सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना रितसर नोटीस पाठवत याबाबत आदेश दिले आहे. महापालिकेच्या या कारवाईवर काही हॉटेल मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोळसा भट्टी बंद केल्याने तंदूर रोटीच्या चवीत बदल होईल, असं काहीचं म्हणणं आहे. असं असलं तरी कोर्टाच्या आदेशानुसार आता तंदूर कोळसा भट्टी वापरण्यास बंदी असणार आहे.
SL/ML/SL
16 Feb. 2025