सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन कंटेनर बांबूचे फर्निचर इस्त्रायलला निर्यात

सिंधुदुर्ग दि २० — जिल्ह्यातून दोन कंटेनर भरून बांबूचे फर्निचर इस्त्रायल या देशात निर्यात झाले आहे. सिंधुदुर्गातील कोनबॅक आणि चिवार संस्थेने हे फर्निचर बनविण्याची कामगिरी केली आहे.भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा हा बांबूचं मोठं जागतिक प्रकिया केंद्र बनेल,असा विश्वास कोनबॅक संस्थेचे संचालक संजीव करपे यांनी व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबूचे दर्जेदार उत्पादन होत आहे.या जिल्ह्यात कोनबॅक व चिवार या संस्था नावाजलेल्या अशा बांबू प्रक्रिया संस्था आहेत.कोनबॅक संस्थेचे संचालक संजीव करपे यांनी माहिती देताना सांगितले,आम्ही चीन, व्हिएतनाम आणि इंडोनेशियासारख्या देशाच्या जागतिक स्पर्धकांना मागे टाकून ही ऑर्डर मिळवली आहे,याचा आम्हाला अभिमान आहे.हे काम मोठं आव्हानात्मक होते.त्याचा नैसर्गिक पणा टिकवून दर्जेदार, सौंदर्यपूर्ण आणि कलात्मक रचना हवी होती.
आम्ही गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही. क्लायंटला हवं तस मनासारखं वेळेत काम करून दिले,त्यामुळे क्लायंट सुद्धा आमच्या कामावर समाधानी झाला आहे. इस्रालय देशात युद्धजन्य गंभीर परिस्थती असून सुद्धा आम्ही हे धाडस केले आणि दोन कंटेनर फर्निचर क्लायंटकडे निर्यात केले.आमची संपूर्ण टीम व कारागीर यांचे अथक परिश्रम आणि चिवार संस्थेच्या प्रयत्नामुळे हे काम करण्यात यशस्वी झालो.भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा हा बांबूच प्रकिया केंद्र बनेल ,असा विश्वास करपे यांनी व्यक्त केला आहे. ML/ML/MS