बालवीर फेम अभिनेता घेणार चंद्रावर भरारी
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोनी सब टीव्हीवर 2012 ते 16 मध्ये प्रसारित झालेल्या ‘बालवीर’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला सुपरहिरो देव जोशी आता खऱ्या आयुष्यातही एका धाडसी मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. नुकतीच त्याने सोशल मिडियावर पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे. Balveer fame actor will Participate in Dear Moon Mission
तब्बल 1100 भागांच्या या मालिकेतील देव ने साकारलेले बालवीर’चे ते पात्र लहान मुलांमध्ये आजही कायम अजरामर आहे. देव लहान मुलांमध्ये चांगला प्रसिद्ध असून त्याचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत. देव आता खऱ्या आयुष्यात थेट चंद्रावर गगनभरारी घेणार आहे. त्याच्या कामगिरीने त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. जपानी अब्जाधीश युसाकू माएझावा यांनी ‘डिअरमून’ ही चंद्रमोहीम आखली आहे.
2023 स्पेसएक्स रॉकेटमधून ८ लोकांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. ‘डिअरमून’ मोहिमेवर त्यांच्यासोबत जाणार्या आठ क्रू सदस्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आले आहेत. त्यात बालवीर फेम अभिनेता देव जोशी हा चंद्रावर जाणाऱ्या 8 महत्वाच्या व्यक्तींपैकी एक असणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे.
‘डिअरमून’ मोहिमेविषयी माहिती देत देव जोशी म्हणाला, ” या युनिव्हर्सल प्रोजेक्टमध्ये जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना मला याचा सार्थ अभिमान वाटत आहे. सध्या मला वाटत असणारी भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण भावना शब्दांचाही पलीकडच्या आहेत…#dearMoon च्या अशा विलक्षण, अविश्वसनीय, आयुष्यात एकदाच येणाऱ्या प्रकल्पाचा भाग असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आयुष्याने मला नेहमीच नवीन संधी देऊन आश्चर्यचकित केले आहे आणि मी कधीही न केलेला विचार हा संधीच्या रुपात मला मिळतोय, याचा अभिमान आहे.
SL/KA/SL
10 Dec. 2022