बलुचिस्तानात पहिल्या हिंदू महिलेची असिस्टंट कमिशनर पदी नियुक्ती

कराची: (१३ मे) : पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात हिंदू महिला कशिश चौधरीची (वय २५ ) सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.ही एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे. चगाई जिल्ह्यातील नोशकी या दुर्गम शहरातील रहिवासी असलेल्या कशिशने बलुचिस्तान लोकसेवा आयोग (बीपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली.
सोमवारी, कशिशने तिचे वडील गिरधारी लाल यांच्यासह क्वेटा येथे बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुग्ती यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की ती महिला आणि अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रांताच्या सर्वांगीण विकासासाठी काम करेल.