बालनाट्य लेखनाबद्दल डॉ शिवणेकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार…

मुंबई दि ८ : लेखक आणि कवी डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांना सशा रे सशा तुझ्या तुपातल्या मिशा या बालनाट्याच्या लेखनाबद्दल श्री संत किसन महाराज सुडके जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार_2025 हा मान्यवरांच्या हस्ते कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी काल प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण सोहळा श्री संत किसन महाराज सुडके आश्रम संतनगर कांगोणी, तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे निसर्गरम्य परिसरात टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानियांचा राजा ज्ञानदेवांच्या पावन भूमीत आणि आध्यात्मिक वातावरणात दिमाखात संपन्न झाला.
कविता कथा कादंबरी बालसाहित्य नाटक चरित्र ललित आणि पत्रकारिता या वाड्:मयप्रकारातील उत्कृष्ट वाड्:मय निर्मितीची निवड करण्यात आली होती. या प्रसंगी खासदार निलेश लंके आमदार आबासाहेब अभंग सुप्रसिद्ध किर्तनकार व आयोजक श्री संत गुरु बाळकृष्ण सुडके महाराज, गुरुदेव मुंडे, ह.भ.प. पोकळे महाराज, दिघे महाराज, लक्ष्मणरावजी पोंगे महाराज, कोकणी महाराज, सभापती सतीश थोरात, तुकाराम थोरात आदि मान्यवर व प्रतिष्ठान मधील सर्व संतमंडळी उपस्थित होती.ML/ML/MS