रेलवे रुळाखालील गिट्टी पावसामुळे वाहून गेली, गाड्या प्रभावित

 रेलवे रुळाखालील गिट्टी पावसामुळे वाहून गेली, गाड्या प्रभावित

अकोला, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मूर्तिजापूर-माना रेल्वे स्थानकादरम्यान रुळाखालील गिट्टी वाहून गेल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होते रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू होते.

हिरपूर गेट जवळ पावसाच्या पाण्याने रुळाखालील गिट्टी वाहून गेल्याने आज मोठी जीवित हानी टळली. मध्य रेल्वे मार्गावरील सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या व सुपरफास्ट एक्सप्रेस याच रुळावरून धावतात. ही घटना नागरिकास माहीत पडल्याने तातडीने रेल्वे रेल्वे प्रशासन हे जागे होऊन तातडीने कामास लागले. जर ही घटना कोणाच्या लक्षात आली नसती तर अनेक जीवित हानी होण्यास वेळ लागला नसता.

या गाड्या शॉर्ट टर्मिनेट

१२१३९ सीएसएमटी-नागपूर एक्स्प्रेस भूसावळ स्थानकावर थांबविण्यात आली.

०११४० मडगाव-नागपूर एक्स्प्रेस अकोला स्थानकावर थांबविण्यात आली.

१२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस बडनेरा स्थानकावरच थांबवून परत अमरावतीला पाठविण्यात आली.

१११२१ भूसावळ-वर्धा एक्स्प्रेस मुर्तीजापूर स्थानकावर थांबवून रद्द करण्यात आली.

या गाड्या वळविल्या

पुरी-सुरत एक्स्प्रेस नरखेड, इटारसी, खंडवा, भूसावळ मार्ग वळविण्यात आली.

बिलासपूर-हापा एक्स्प्रेस नागपूर, इटारसी, खंडवा, भूसावळ मार्गे वळविण्यात आली.

सुरत-मालदाटाऊन एक्स्प्रेस भूसावळ, खंडवा, इटारसी, नागपूर मार्ग वळविण्यात आली.

हिसार-सिकंदाराबाद एक्स्प्रेस अकोला, पूर्णा नांदेड मार्गे वळविण्यात आली.

या गाड्यांच्या वेळेत बदल

१२१४० नागपूर-सीएसएमटी एक्स्प्रेस ही नऊ वाजता सुटणारी गाडी रात्री १:१५ वाजता सोडण्यात येईल

१२२९० नागपूर-सीएसएमटी ही २०:४० ला सुटणारी गाडी ००:४० वाजता सोडण्यात येईल.

मुंबई व नागपूरकडे जाणारी वाहतूक आता सकाळी पूर्ववत सुरू झाली आहे रात्रभर रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करून रेल्वे पूर्ववत केले आहेत सर्व रेल्वे गाड्या ह्या उशिरा धावत आहेत

ML/KA/SL

11 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *