बाळासाहेब ठाकरेंचा नातू झळकणार रुपेरी पडद्यावर
मुंबई, दि. ४ : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे आता रुपरे पडद्यावर पदार्पण करत आहे. ऐश्वर्य ‘निशानची’ या चित्रपटातून बॉलिवूड चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. . त्याच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया प्रेझेंट ‘निशानची’ या सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर रिलीज झालाय. अनुराग कश्यप दिग्दर्शित, हा सर्वोत्कृष्ट देशी मसाला असलेला सिनेमा असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे.
या सिनेमाची निर्मिती अजय राय आणि रंजन सिंह यांनी जार पिक्चर्स अंतर्गत, फ्लिप फिल्म्सच्या सहकार्याने केली आहे. प्रसून मिश्रा, रंजन चंदेल, तसेच अनुराग कश्यप यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे. ऐश्वर्य ठाकरे, वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद जीशान अय्यूब, त्याचप्रमाणे कुमुद मिश्रा यांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘निशानची’ हा सिनेमा 19 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
सिनेमाविषयी बोलताना लेखक, दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणाला, “अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया सोबत काम करणे अत्यंत फलदायी ठरले. कारण त्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला. ऐश्वर्य, वेदिका, मोनिका, झिशान, कुमुद आणि या सिनेमातील प्रत्येक कलाकाराने केवळ अभिनयच केला नाही, तर या पात्रांसोबत जगले आहेत. कथेप्रती त्यांची बांधिलकी आणि अभिनयाची सत्यता या कलाकृतीत चमकते. माझ्या टीमने त्या उत्कटतेची जुळवाजुळव फ्रेम-टू-फ्रेम केली आहे. ज्यामुळे सिनेमा इतका चांगला बनला. शिवाय त्याच्या संगीतातदेखील तीच भावना सिनेमातून वाहते आणि कथेत भर घालते. प्रेक्षकांना हे संगीत खरोखरच आवडेल मला याची खात्री वाटते.”