बाळासाहेब ठाकरे विधिमंडळात
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूूज नेटवर्क) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात काल प्रदर्शित करण्यात आले. बाळासाहेबांच्या जयंतीदिनानिमित्त काल संध्याकाळी हा कार्यक्रम झाला.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर येथील समाजकारण आणि राजकारण यावर अमिट छाप उमटवणाऱ्या बाळासाहेबांचे तैलचित्र आता राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, थोर स्वातंत्र्यसेनानी झाशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या लोकोत्तरांच्या मांदियाळीत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झळकत राहणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्रिमंडळातील सहकारी दीपक केसरकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज ठाकरे, तसेच ठाकरे कुटुंबातील सदस्य गण, खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते.
ML/KA/SL
24 Jan. 2023